श्री. कल्याणसुंदरम "अमेरिकन मॅन ऑफ द मिलेनियम "

           ज्या समाजात सचिन तेंडुलकर ला "भारतरत्न " म्हणून गौरवण्यात येते आणि संपत्तीचा पूर डोक्यावरून वाहत असताना आपल्या "फेरारी" कारवरील कस्टमड्यूटी माफ व्हावी अशी  मागणी करण्यास त्याला आणि ती मान्य करण्यात आपल्याला काही दिक्कत वाटत नाही  अश्या समाजातील किती  जणांना ही गोष्ट माहीत आहे  ? (निदान मला तरी आजपर्यंत हे माहीत नव्हते आणि त्याची लाजही वाटते)  
      श्री. कल्याणसुंदरम हे ३० वर्षे ग्रंथालय प्रमुख म्हणून कार्यरत होते आणि आपले संपूर्ण वेतन गरजू लोकाना मदत करण्यासाठी वापरत होते आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी एका हॉटेलात वेटर म्हणून काम करत होते. आपले जवळजवळ १० लाख  इतके निवृत्तिवेतनही त्यानी गरजूंच्या मदतीसाठी दान केले. आयुष्याची सर्व मिळकत सामाजिक कार्यासाठी खर्च करणारी एकमेव व्यक्ती म्हणून अमेरिकन शासनाकडून " मॅन ऑफ द मिलेनियम " सन्मानाने त्याना गौरवण्यात आले. त्या पारितोषिकातून मिळालेल्या ३० कोटी रु. या रकमेचा विनियोगही त्यानी तसाच केला आहे. त्याच्या या जगावेगळ्या दातृत्त्वाने भारावून जाऊन सुपरस्टार रजनीकान्त यांनी त्याना आपल्या पित्याच्या स्थानी मानले आहे. श्री. कल्याणसुंदरम यानी अविवाहित राहून आपले सर्व आयुष्य  याप्रकारे समाजासाठी वेचले आहे. सर्व भारतीय राजकारणी ,चित्रपट तारे, तारका , क्रिकेटपटू आणि सर्वच भारतीय नागरिकांना या व्यक्तीचा अभिमान वाटला पाहिजे व त्याचबरोबर अमेरिकन सरकार ज्या माणसाचा गौरव करते अश्या माणसाला आपण ओळखतही नाही याची लाज बाळगली पाहिजे. 
(मला आलेल्या एका विपत्राचा शब्दशः अनुवाद , फक्त कंसातील मजकूर माझा )