परदेशात शिक्षणाचा उद्देश

   अनेक मुले पदवीनंतरचे शिक्षण परदेशात घेतात. त्याकरिता त्यांचे पालक कर्ज घेणे, स्कॉलरशिप मिळविणे इत्यादी प्रकारांनी शुल्काच्या रकमेची तयारी करतात. मुलाला पाठवतात. शिक्षण संपवून मुलगा किंवा मुलगी, भारतात परततात व येथे सेवा देण्यास सुरुवात करतात. नोकरी करतात किंवा स्वतःचा उद्योग सुरु करतात. 
   अनेक मुले भारतातच पदव्युत्तर शिक्षण घेतात व भारतात सेवा देतात. परदेशात शिकण्यासंदर्भात खालील मुद्दे दिसतात.
  1. कोणी काय करायचे, हा व्यक्तिगत प्रश्न आहे.  
  2. परदेशातून शिकून आल्यावर वेतन जास्त मिळते.
  3. उच्च तंत्रज्ञानाची ओळख परदेशात होते.

   तरीही, हा प्रश्न पडतो.
   भारतात शिकून भारतात चांगली सेवा देता येते, हे खरे असेल तर परदेशात शिकण्याचा उपयोग काय आहे, काय असावा ?