आदरणीय पोलीस खात्याने हे स्पष्ट करावे का ?

     सध्या एका स्टारच्या मुलाचे प्रकरण गाजत आहे. अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप ठेवून पोलीसांना त्याला ताब्यात घेतले व आता त्याच्यावर खटला सुरु आहे. प्रकरण सुरु झाल्यावर काहींनी पोलिसांची प्रशंसा केली. काही अभिनेते स्टारपुत्राच्या बाजूने उभे राहिले आहेत. काहींनी अस्पष्टपणे त्याला अडकवले जात आहे, असे सुचवले. फक्त बॉलीवूडमध्येच हे चालते असे नाही, इत्यादी मोघम विधाने केली गेली. पूर्वीही देशात अनेक प्रकरणे गाजली. तेव्हाही हे सगळे खोटे आहे, पुरावे पेरले होते इत्यादी सुचवणा-या व्यक्ती उगवून गेल्या. अशा व्यक्ती पोलीस तपास सुरु असताना अशी विधाने करतात. ही समाजाची दिशाभूल आहे, असे वाटते. निरीक्षण असे आहे की, पोलीस फार कोणाला स्पष्टीकरण देत नाहीत. ते रीतसर व्यवस्थित काम करत राहतात.
    कारवाईच्यापुढे जाऊन आदरणीय पोलिसांनी - अमुक माणसाने गुन्हा केलाय, आम्ही योग्य ते  करीत आहोत. इतरांनी बोलू नये. - असे स्पष्ट करावे, असे वाटते का?