चिकन क्रीम काफ्रिआल

  • बोनलेस चिकन (ब्रेस्ट पीसेस) - ५०० ग्रॅम [गोदरेज वा तत्सम नाममुद्रेचे]
  • काफ्रिआल मसाला पेस्ट - ५० ग्रॅम
  • फ्रेश क्रीम - २५० ग्रॅम [अमूल वा तत्सम नाममुद्रेचे]
  • हळद - एक टेबलस्पून
  • तेल - एक डाव
६ तास
दोन/तीन जणांना जेवणातील मुख्य पदार्थ म्हणून

बोनलेस चिकन पीसेस धुऊन घ्यावेत. त्यांना हळद आणि काफ्रिआल मसाला पेस्ट लावून पाच तास झाकून ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. पाचहून अधिक तास (रात्रभर) ठेवायचे असल्यास फ्रीजमध्ये ठेवावे.

पॅनमध्ये एक डाव तेल तापवावे. धुरावल्यावर ज्योत बारीक न करता चिकन पीसेस घालावेत आणि एक एक मिनिटांनी पलटावेत. पाच ते सात मिनिटांत चिकन रंग पालटू लागेल. ज्योत बारीक करून झाकण ठेवावे. आठ ते दहा मिनिटांत चिकन निम्याहून जास्ती शिजेल.

झाकण काढून क्रीम घालावे आणि ज्योत मोठी करून सारखे करून घ्यावे. ज्योत बारीक करून झाकण ठेवून पाच ते आठ मिनिटे शिजवावे.

झाकण काढून पाच ते आठ मिनिटे हलवत रहावे. क्रीम थोडे आळेल आणि रंग बदलेल.

ज्योत बंद करावी.

(१) काफ्रिआल मसाल्यात मीठ असते. कमी/मध्यम प्रमाणात मीठ खाणाऱ्यांना अजून मीठ घालण्याची गरज भासणार नाही. घालायचे असल्यास क्रीम घालण्याआधी चिकनचा एक छोटा तुकडा चाखून पहावा आणि गरजेनुसार मीठ घालावे.

(२) काफ्रिआल मसाल्याखेरीज यात काहीही नाही. ही चव आवडत नसल्यास या मार्गाला जाऊ नये. इतर पाककृतींना मतदान करावे.

(३) मोठ्या गार्लिक ब्रेडच्या मध्यम आकाराच्या फाका करून तव्यावर कुरकुरीत करून घ्याव्यात. त्यावर हे चिकन घालून थोडी पार्मेसान चीज पावडर आणि मिरपूड भुरभुरावी (ऐच्छिक).

(४) क्रीम घालण्याआधी ज्योत मोठी करून ४० ते ६० मिली ब्रॅंडी (मॅन्शन हाऊस वा नेपोलिअन) घालावी. ब्रॅंडी पेट घेईल. पॅन उचलून पाखडल्यासारखा हलवावा. ब्रॅंडी जळून जाईल आणि चिकनला धुरावल्याची चव येईल. (ऐच्छिक)

स्वप्रयोग