इराकचा विरोधाभास

अमेरिकेच्या सरकारने अत्यंत खोटारडी कारणे देऊन इराकवर हल्ला केला. सद्दामला हाकलले (त्याबद्दल दुःख नाही) . आणि तिथले सध्याचे अराजक आपण बघतोच आहे.
  काल परवा अशी बातमी होती की नव्या इराकमधे संविधान बनवताना इस्लाम आणि शरियत पायाभूत मानले जातील. म्हणजे अमेरिकेने अब्जावधी डॉलर खर्च करुन हे "युद्ध" लढले आणि त्याची परिणती कशात तर इस्लामी कायद्यांवर आधारित राष्ट्रनिर्मिती!


इराकवर आम्ही हल्ला का केला ह्याची वेगवेगळ्या वेळी वेगळी कारणे दिली गेली. सुरवातीला इराककडे असणारी कपोलकल्पित महासंहारक शस्त्रे, मग सद्दामचे उच्चाटन, मग लोकांना मुक्त करणे, मग मध्यपूर्वेत लोकशाहीची स्थापना, मग अतिरेक्यांचे निर्मूलन वगैरे, वगैरे, वगैरे.
पण शेवटी जर इस्लामी कायद्यांवर आधारित राष्ट्र बनत असेल तर स्वातंत्र्य, लोकशाही, महिलांचे हक्क ह्यांचे काय? असल्या कट्टर धार्मिक समाजात जास्त अतिरेकी पैदा होतात त्याचे काय?
असले कट्टर राष्ट्र स्थापन होणे भारताच्याही हिताचे नाही. कारण असल्या गडद हिरव्या चष्म्यातून आपण काफिरच दिसतो.


आपणांस काय वाटते?