संजय चौधरींची कविता

मित्र हो,
नुकताच नाशिककर कवि श्री‌‌. संजय चौधरींचा 'माझं इवलं हस्ताक्षर" हा कविता-सन्ग्रह वाचला. एक अत्यंत तरल व खोलवर जाऊन भिडणारी, समाधान देणारी पण अस्वस्थ करणारी कविता आहे. अल्प शब्दात खूप सांगून जातात संजय चौधरीं ! त्याच्या 'आई' विषयक कविता मूळातूनच वाचल्या पाहिजेत.(त्याची आई त्यांच्या लहानपणीच गेली.) या संदर्भात ही कविता पहा म्हणजे संजयच्या लेखणीच्या ताकदीची कल्पना यावी.


पाउलखुणा


तुझ्या
पाउलखुणा
शोधत येणार होतो मी.
...
तू
तर
खांद्यावरून गेलीस.


तसेच 'परवड' या कवितेत ते सीतेला विचारतात.


'तुझ्याजवळ तर राम होता बये!
तरी टळली नाही
तुझी परवड.


माझी वणवण कुणी थांबवावी.?


आणखी कविता देण्याचा मोह आवरून 'माझं इवलं हस्ताक्षर' मूळातून
वाचावा ही 'मनोगतीं'ना विनंती.
'माझं इवलं हस्ताक्षर' ,राजहंस प्रकाशन, किं.६० रू.


जयन्ता५२