मुगडाळीचा शिरा

  • १ वाटी मुगाची डाळ
  • १ वाटी साखर
  • अर्धी वाटी साजूक तुप
  • १ वाटी पाणी
  • १ वाटी दूध
  • वेलदोडा पूड पाव चमचा
  • बेदाणे, बदाम काप आवडीनुसार
३० मिनिटे
२ जणांना

कृती

  • मुगडाळ धुऊन २-३ तास भिजत घाला.
  • भिजल्यानंतर पुन्हा धुऊन उपसून ठेवा आणि बारीक वाटा.
  • कढईत तूप घालून वाटलेली डाळ गुलाबी रंगावर परता (प्रखर आचेवर).
  • दुसरीकडे दूध-पाणी एकत्र करून उकळवून त्यात घाला.
  • मंद आचेवर ३-४ वाफा आणा.
  • आता साखर घालून परत मंद आचेवर दोन वाफा येऊद्या.
  • बदाम-काप, वेलदोडा पूड, बेदाणे घाला आणि परत एक वाफ आणा.
  • गरमच खा.

निम्मे दूध - निम्मे पाणी न वापरता २ वाट्या दूध वापरले तरी चालते.

सौ. आई (ए आई, अहो आई नव्हे)