उन्माद

ढळता पदरासह संयमही जरासा
ढळला ध्रुव तो पदावरूनी जरासा


वसनें तव अंगी चिंब आरस्पानी
झालो दर्शने मदमस्त मी जरासा


अनिमिष नेत्रं अन गात्रें चेतलेली
उन्मादात गेला तोलही जरासा


बेभान होऊनी तुला भेटता मी
कशास आडपडदा ठेविसी जरासा


आता सोड लाज डोळ्यांतील सखये
आता सोडतो जनरीत मी जरासा


अधरामृत प्राशिले जरी मी भरोनी
राहिलो ना तरी ग उपाशी जरासा


साहवे ना दुरावा प्रेमात अपुल्या
आज रंगु दे अनंगरंगी जरासा