(सवय झाली)

जे रुचे ते उचलण्याची सवय झाली,
या इथे ते छापण्याची सवय झाली!

लेख कविता चर्चा वा ही विडंबने,
रोज 'पाट्या टाकण्याची' सवय झाली

पाहा! तोल ही ढळे चर्चा रंगताना,
काय झाले? भांडण्याची सवय झाली

ढीग नसत्या प्रतिसादांचा पाडताना,
मूळ चर्चा चुकवण्याची सवय झाली

वेळ कुठला मते सारी वाचण्याला,
जे माझे ते दामटण्याची सवय झाली

जोडल्याविन जात नाही दिवस त्याचा,
मोकाट जी वावरण्याची सवय झाली

प्रेरणा - (सवय झाली)