सोयाबीनची भाजी

  • बाजारात मिळणारे सोयाबीनचे १ पाकिट(सांडग्यासारखे दिसतात.)
  • कोथिंबीर
  • मसाला
  • तळणीपुरते तेल
  • मीठ
३० मिनिटे
सोयाबीन आवडते असे निवडक लोक

१. सोयाबीनचे २ मुठी नग पाण्यात भिजत टाकावेत.
२. १५ मिनीटांनी काढून हाताने व्यवस्थित पिळून पाणी काढून टाकावे.
३. तेलात खमंग तळावे.
४. फोडणी करावी.
५. त्यात हे सोयाबीन चांगले परतावेत.
६. मीठ मसाला कोथिंबीर टाकून नीट मिसळेपर्यंत हलवावे.
७. गरम गरम भात/खिचडी/पोळीबरोबर खावी.

सोयाबीन बऱ्याच जणांना आवडत नाही. पण जेव्हा ताज्या भाज्यांची साठवण ठेवण्यासारखी परिस्थिती किंवा चिरणे वगैरे वेळ नसेल तेव्हा ही भाजी मदतीला येते. कुरकुरीत लागते. सोयाबीन नीट भिजू द्यावे.

वसतिगृहात मैत्रिणींचे बघून