एक वात

आई नेहमीच सांगायची


बाबा राहतात दूर चांदण्यांत


त्यावेळी खोलवर दाटून यायचं


काहीतरी तिच्या पापण्यांत


 


मी मग आकाशात पहायचो


होइपर्यंत अगदी पहाट


रात्र रात्र जागून जाळायचो


ह्रदयात तेवणारी...एक वात.