मलाई कोफ्ता

  • ३ मध्यम आकाराचे बटाटे , १ वाटी मटारचे दाणे, १ वाटी चिरलेले फरसबी, ३ गाजरे, फूलगोबीचे ३-४ तुरे
  • २ टोमॅटो, २ मध्यम आकाराचे कांदे, ३ पाकळ्या लसूण, १ इंच आले, २ चमचे पावाचा चुरा(ब्रेड कम्बस), ३ चमचे मक
  • १ चमचा खसखस, मूठभर काजू, २ मिरे, २ लवंगा, १ तमालपत्र
  • मलाई २५० ग्रॅम, तिखट,मीठ, हळद,
  • तळण्यासाठी तेल
४५ मिनिटे
४ जणांसाठी

कोफ्ताः
बटाटे,गाजराच्या फोडी करून मटार,फरसबी,फूलगोबी एकत्र कुकरमध्ये उकडून घ्यावेत. एका शिटीत होतात. बाहेर काढून चाळणीत निथळायला ठेवा. थंड झाल्यानंतर त्यात पावाचा चुरा, मक्याचे पीठ, १ चमचा तिखट व चवीपुरते मीठ मिसळा. चांगले कुस्करून त्याचे गोलाकार किंवा चपटे कोफ्ते बनवा. तेल गरम करून सोनेरी रंगावर तळून बाजूला ठेवून द्या.

ग्रेव्हीः
लसूण आल्याची पेस्ट करून घ्या. कांदे पातळ उभे कापून घ्या. खसखस आणि काजू मिक्सर मधून भुकटी बनवून घ्या. टोमॅटोची प्युरी बनवून ठेवा.
कढईमध्ये फोडणीपुरते तेल टाकून त्यात मिरे,लवंगा आणि तमालपत्र टाका. त्यात कांदा घालून तांबूस रंगावर परतून घ्या. मग त्यात टोमॅटोची प्युरी व काजू/खसखशीची भुकटी, अर्धी मलाई आणि थोडेसे पाणी टाकून २-३ मिनिटे परतून घ्यावे. थोडेसे तिखट/मीठ आणि हळद घालून मंद आचेवर पाच मिनिटे शिजू द्या.

प्रमुख कृतीः
 एका भांड्यात कोफ्ते मांडून सगळ्या कोफ्त्यांना लागेल अशी त्यावर अर्धी मलाई टाका. वरतून ग्रेव्ही टाका आणि कोथिंबिरीने सजवून वाढायला घ्या.

कोफ्ते जर तळताना तुटतील असे वाटत असतील तर बनवून ५ ते ७ मिनिटे शीतकपाटात ठेवावीत. नंतर तळल्यास तुटत नाहीत.

वाढताना काळजीपूर्वक/अलगद वाढावेत नाहीतर तुटतात.

आणखी काही सूचना असतील तर स्वागत आहे.

प्रयत्ने ..माहितीजाल व ऐकीव माहिती