अन्नातून रोगप्रसार

मानवप्राणी अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असल्याने त्या सजीवांच्या आरोग्या-अनारोग्याचा त्याच्या प्रकृतीवर परिणाम होणे हे अगदी स्वाभाविक वाटते. मांसाहारामध्ये हा परिणाम बऱ्याचदा वाचनात आलेला आहेच ( उदा. बर्ड-फ्ल्यू ) परंतु हा धोका शाकाहारामध्येदेखील आहे का? हे जाणून घेण्याची इच्छा आहे. कृपया कोणी याबद्दल काही माहिती देऊ शकेल का? धोका असल्यास तो टाळण्याबद्दल काही युक्त्या असल्यास त्याही सांगता आल्या तर सोनेपे सुहागाच होईल !

सूचना - मूळ अन्नस्त्रोताच्या प्राकृतिक अवस्थेमुळे निर्माण आणि प्रसारीत होणाऱ्या रोगांविषयी चर्चा अपेक्षित असून खाता येण्यासाठी नंतर त्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेतल्या त्रुटींमुळे उद्भवणारे रोग व त्यांचा प्रसार यावरील चर्चा अपेक्षित नाही.