मन उधाण वाऱ्याचे..

अगबाई अरेच्य्या! मधले हे गाणे.. कवीने जितके सुंदर शब्द योजले आहेत तितकेच अप्रतिम संगीत ह्य गाण्यला लाभले आहे..प्रत्येकाला वेड लावेल असे हे गाणे आहे..


                    मन उधाण वाऱ्याचे...


मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते ,नात्यांच्या बंधात धुंद मोहरते..


मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे ,का होते बेभान कसे गहिवरते...


मन उधाण वाऱ्याचे ...


 


आकाशी स्वप्नांच्या हरपुन पान शिरते,


 हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते,


सावरते बावरते झडते अडखळते का पडते..


कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते..


मन तरंग होउन पाण्यावरती फ़िरते..


अन क्षणात फिरूनी अभाळाला भीडते..


मन उधाण वाऱ्याचे...


 


रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते..


कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..


तळमळते सारखे नकळत का भरकटते..


कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..


जाणते जरी हे पुन्हा पुन्हा क चुकते..


भाबडे तरी भासांच्या मागुन पळते..


मन उधाण वऱ्याचे..