निष्ठा

वेळ - एक रविवारची शांत सकाळ...


हेमंतराव झोपेतून उठतात, अजूनही कालच्या दारू पार्टीचे परिणाम जाणवत आहेत. सुजलेले डोळे, जड डोके आणि पत्नीकडून अपेक्षित दमाची भीती या सर्व गोष्टींचे मिश्र प्रभाव त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत आहेत.


अचानक त्यांची नजर पलंगाशेजारील टेबलावर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासाकडे गेली. सोबत दोन पेनजॉनच्या गोळ्याही होत्या. आणि जोडीला एक छोटे पत्र.


पत्रातील मजकूर खालीलप्रमाणे...


 


प्रिय हेमू ,


मी बाजारात जात आहे, लवकरच परत येते. तुझ्या आवडीचे वांगेभरीत करणार आहे आज. जर डोके जास्त दुखत असेल तर त्या गोळ्या घे. किचनमध्ये गरमा-गरम नाश्ता आणि आल्याचा चहा आहे तो घे आणि थोडा आराम कर.


आय लव्ह यू माय डार्लिंग हब्बी...!!


सर्वस्वी तुझी, प्रिया.


 


या अनपेक्षित प्रेमाने पार गोंधळून गेलेल्या अवस्थेत हेमंतराव किचनमध्ये पोहोचले आणि नाश्ता करता-करता त्यांनी आपल्या मुलाला काल काय-काय घडले हा प्रश्न केला.


मुलाने सांगितले की काल हेमंतराव काल उशीरा घरी आले आणि त्यांनी खिडकीचे तावदान तोडले, पडद्यावर उलटी करून तो माखवला, नवीन फुलदाणी फोडली.......


हेमंतराव - मग तुझ्या आईने माझ्याशी जबरदस्त भांडण करायला हवं होतं. ती इतक्या प्रेमाने का वागत आहे?


मुलगा - ओह्ह... एकदाचं ह्यांना झोपवूया म्हणजे कटकट नाही, असं म्हणून आई तुम्हाला कसंबसं ओढत बेडरूममध्ये घेऊन गेली आणि जेव्हा ती तुमचा टाय आणि शर्टाची बटणं मोकळी करू लागली तेंव्हा तुम्ही अर्धवट गुंगीच्या अवस्थेतदेखील तिला म्हणालात...


"बाई, मला हात लावू नका, प्लीज जाऊ द्या... मी विवाहित आहे."


 


तात्पर्य - निष्ठावंत सदा सुखी!!!