गुरुजी म्हणाले कुल्फीला
तुझं व्याकरण कच्चं आहे
माझ्या लेखनाकडे पहा
व्याकरण माझ्या घरचं आहे!
गुरुजी म्हणाले कुल्फीला
"गधडे, शुद्ध लिहायला शीक"
"मि" कसा अचूक लिहितो
माझं सगळंच आणभविक
गुरुजी म्हणाले कुल्फीला
कुल्फ्ये तुझं जिवन व्यर्थ
तुला जमेना संस्कृत धड
कसले आज्ञार्थ आणि विध्यर्थ
(असं असलं तरीही)
गुरुजी घालतात शुद्धलेखन
सं.स्प. आणि वाक्प्रचार
"खालील शब्दांचे अर्थ" लिहिताना
चालू असतो वृत्तविचार
कुल्फी म्हणे गुरुदेवासी
दोन्हीही कर जोडून
तुम्हा करुनी नमन
कुल्फी जाई वितळून
कुल्फी
१ मार्च २००६