जातीयवादी कोण?

२८ फेब्रुवारीला "चर्चा" या सदरांत मी असा प्रस्ताव मांडला होता की जोपर्यंत समान नागरी कायदा होत नाही तोपर्यंत हिंदू स्त्रियांनी मुस्लिम पुरुषांशी विवाह करू नयेत. त्यावर हा जातीयवादी फतवा आहे अशा अर्थाच्या काही प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांना उद्देशून एक मार्च रोजी मी प्रतिसाद लिहिला होता. पण (बहुधा नवीन लेखनाच्या रेट्यामुळे) त्याची कोणी दखल घेतली नाही असे आढळून आले. म्हणून तो प्रतिसाद येथे लेखरूपाने देत आहे.  

समान नागरी कायदा अस्तित्वांत नसल्यामुळे "द्विभार्या प्रतिबंधक कायदा" मुस्लिमांना लागू होत नाही. तसेच मुस्लिमांतील विवाह मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे होतात. त्याची नोंद काजीकडे असते असे म्हणतात. हे विवाह सरकारी विवाह निबंधक कार्यालयांत नोंदणीकृत करायला मु.प.लॉ बोर्डाने विरोध दर्शवला आहे. या सुसूत्रतेच्या अभावाचा गैरफायदा मुस्लिम पुरुषाला मिळून त्याला हिंदू स्त्रीची कायद्याच्या कचाट्यांत न सापडता फसवणूक करता येते.

याशिवाय हिंदू स्त्रियांनी मुस्लिम पुरुषांशी विवाह का करू नयेत याची आणखीही कारणे आहेत. त्यांतील एक कारण म्हणजे मुसलमान कुटुंबनियोजनाच्या विरुद्ध आहेत. त्यांना आपली संख्या वाढवायची आहे. कारण लोकशाहींत सत्ता कोणाच्या ताब्यांत जाईल हे संख्येवर अवलंबून असते व प्रत्येक डोक्याला (गुणवत्ता असो वा नसो) एकच मत असते. हिंदू स्त्री ही अनियंत्रित मुस्लिम प्रजननाचे यंत्र म्हणून वापरली जाणार आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे हिंदूंसाठी आत्मघातकी आहे.

दुसरे कारण म्हणजे आंतरधर्मीय विवाह हा जवळजवळ एकतर्फी मामला असतो. मुस्लिम स्त्रीने धर्माबाहेर लग्न करू नये असा मुस्लिमांचा कटाक्ष आसतो. त्याचे इतिहासांतील उदाहरण म्हणजे सम्राट अकबर. त्याने हिंदू स्त्रियांशी लग्ने केली. पण त्याच्याच अमदानींत मुसलमान स्त्रियांची हिंदू राजांशी लग्ने झाल्याची नोंद इतिहासांत नाही. दुसरे उदाहरण म्हणजे देवानंद व सुरैय्याचे. मुस्लिमांच्या कट्टर विरोधामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही हे सत्य सुरैय्याच्या आत्मकथनांत प्रसिद्ध झाले आहे. अगदी अलीकडचे राजकीय क्षेत्रांतील उदाहरण म्हणजे राजेश पायलटांचा मुलगा सचिन व फारुख अब्दुल्लांची मुलगी सारा यांचा प्रेमविवाह. १६ जानेवारी २००४ च्या लोकसत्तेंत "फारुख अब्दुल्लांची सारा सचिन पायलटशी विवाहबद्ध" या शीर्षकाच्या बातमींत असे म्हंटले होते की आपल्या कन्येने हिंदू तरुणाशी विवाह केल्यास काश्मीर खोऱ्यांतील कट्टरपंथियांना ते रुचणार नाही व पर्यायाने त्याचा पक्षाला मोठा फटका बसेल या भीतीने फारुख अब्दुल्ला यांचा या विवाहाला प्रखर विरोध होता. त्यामुळेच ते स्वतः व त्यांचे पुत्र माजी केंद्रीय मंत्री ओमर अब्दुल्ला हे उपस्थित नव्हते. मात्र ओमर अब्दुल्लांची पत्नी पायल ही शीख म्हणजे बिगर मुस्लिम असल्याचाही बातमींत उल्लेख होता. त्याला कट्टरपंथियांचा व फारुख अब्दुल्लांचा विरोध होता असे दिसत नाही.

१७ डिसेंबर २००३ ला रीडिफ वर प्रसिद्ध झालेल्या ललित कौल यांच्या "वुइल कश्मिरी पंडित्स रिटर्न ऑन देअर ओन टर्म्स" या लेखांत अशी माहिती दिली आहे की १९८०-९० च्या काळांत काश्मिरी वृत्तपत्रांत जाहिराती देऊन इस्लामी कट्टरपंथियांनी अशी (निर्लज्ज) मागणी केली होती की त्यांना काश्मिरी हिंदू पुरुष विरहित काश्मीर पाहिजे आहे. मात्र काश्मिरी हिंदू स्त्रिया त्यांना ह्व्या आहेत (अर्थात प्रजननाची यंत्रे म्हणून!). यावरून असे दिसते की कट्टरपंथियांच्या हुकमतीखाली राहणाऱ्या (की राहू इच्छिणाऱ्या?) मुसलमानांना हिंदू स्त्रिया प्रजननाची यंत्रे म्हणून, आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी हव्या असतात. पण आपल्या धर्मांतील स्त्रिया विवाह करून दुसऱ्या धर्मांत जाऊन त्यांनी त्या धर्मांत प्रजोत्पादन केलेले मात्र त्यांना सहन होत नाही.