विदूषक

प्रस्तुत करत आहे, मनोगतावरील माझे पहीलेच लेखन. आत्ता पर्यंत नुसत्या प्रतिक्रियाच देत होतो, आता वंशाला लागलोय...


मुखवट्यातून जन्मला मुखवटा अजून एक


कळेना मला, मुखवट्यांचे हे जग द्वैत की अद्वैत


मुखवट्यांच्या गर्दीत खरा चेहरा मी शोधतो


शिंपल्यातला मोती तो गाळाआड दडून राहतो ॥ध्रु॥


 


फिरतो फिरवतो, हसतो हसवतो


नाचतो नाचवतो, अगदी खूष करुन सोडतो


मुखवटे चढवतो माझ्या चेहऱ्यावर मी;


एकामागोमाग एक चढवतच जातो


लोकांना फिकीर नसते माझ्या मुखवट्यांची;


रात्र थोडी सोंगे फार, जमवून आणताना त्रेधातिरपीट होतच असते त्यांची  ॥१॥


सारे काही जमवून आणतो


उत्तमोत्तम विनोद घडवून आणतो


लोकांना आनंदी बघून मला मात्र आनंद होत नाही


मात्र चेहऱ्यावर आनंदी मुखवटा चढवतच जातो


असतो माझा नाईलाज लोकांबद्दल माहीत नाही


शिष्टाचाराच्या मुखवट्यामधे त्यांना दात विचकून हसता मात्र येत नाही ॥२॥


मनोगतावरील परंपरेप्रमाणे केली कविता गोड मानून घ्या. कारण ह्याच कवितेच पुढचं कडवं लिहीण्याच धारिष्ट्य मी लवकरच करणार आहे!


-ग्रामिण मुम्बईकर