मला की नई मनोगताचं व्यसन लागलंय हो ! मनोगताशिवाय एक दिवस सुद्धा करमत नाही. माझ्या मनाची अवस्था खाली देत आहे---
काव्य गोष्टी अन् गप्पा गंमत याची खोड मला लागली ऽऽऽऽ
अन् राया मला मनोगताची ऽऽऽऽ इंगळी डसली !
बारा गावची बारा पाखरं ऽऽ इथं कट्ट्यावरती बसली ऽऽऽऽ
अन् राया मला मनोगताची ऽऽऽऽ इंगळी डसली !
या पाखरांशी सलगी झाली ऽऽ जरी नाती कुनाची नसली ऽऽऽऽ
अन् राया मला मनोगताची ऽऽऽऽ इंगळी डसली !
माझ्या मऱ्हाटी मायलेकरांची कीर्ती ऽऽ जगामदी पसरली ऽऽऽऽ
अन् राया मला मनोगताची ऽऽऽऽ इंगळी डसली !
उतारा नाही या इंगळीला ऽऽ अशी रक्तामध्ये भिनली ऽऽऽऽ
ही माती जशी मनात रूजली ऽऽ अन् काळजात दाटली !
हो राया मला मनोगताची ऽऽऽऽ इंगळी डसली ऽऽऽऽ
(लोकप्रिय लावण्यांवर आधारीत)
धन्यवाद.... जीवेत् मनोगतम् शतम् !
मेघदूत.