भारतमातेच्या सन्मानार्थ पत्रकार परिषद

भारतमातेच्या सन्मानार्थ पत्रकार परिषद

माननीय संपादक / मुख्य वार्ताहर

तब्ब्ल १००० वर्षे पारतंत्र्यात काढल्यावर भारतमातेच्या बेड्या तोडण्यात स्वातंत्रसेनानींना यश आले. भारतमातेच्या वीरपुत्रांनी आपले बलिदान देऊन तिला स्वतंत्र  केले.

मात्र अमेरिकन गुप्तचर संघटना (सी.आय.ए.), सी.एन.एन. व बी.बी‌.सी. या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थांनी भारतीय नकाश्याचे विद्रुपीकरण केले आहे. त्यांनी अखंड काश्मीरचे तीन तुकडे करून ते पाकिस्तान व चीन या शेजारी राष्ट्रांना भेट दिले आहेत. भारताचा हा नकाशा बेकायदेशीर असून या संस्थांनी प्रसार केल्यामुळे जगभरातील सर्व मोठ्या संकेतस्थळांवर व विद्यापीठांत तोच अधिकृत मानला जातो. जगातील ९० टक्के नकाशे खंडित भारत दर्शवतात.

काश्मीर हा भारतमातेचा मुकुट आहे व समस्त भारतवासीयांचा सन्मान आहे. भारताच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या या अतिगंभीर आंतरराष्ट्रीय षङयंत्राची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण आपले प्रतिनिधी व छायाचित्रकार यांना पाठवून सदर वृत्ताला आपल्या लोकप्रिय प्रसिद्धीमाद्यमातून ठळक प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.

हिंदु जनजागृती समितीने विकृत चित्रकार एम.एफ़. हुसेन व सिद्धिविनायक ट्रस्टप्रणीत पंचतारांकित मंदिर परिषद यांच्या विरोधात मोहिमा राबवल्या आहेत.

आपला नम्र,
श्री. रमेश शिंदे
प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
मो. ९३२२६ ५२७११

दिनांक - २७ एप्रिल २००६
स्थळ - मुंबई मराठी पत्रकार संघ,
         मुंबई महापालिकेसमोर
वेळ -  दुपारी ३.३० वाजता