कांद्याची चटणी

  • ३ मध्यम आकाराचे कांदे
  • लसणीच्या ५-६ पाकळ्या
  • लाल तिखट,मीठ,साखर - चवीनुसार
  • ४-५ चमचे दाण्याचे कूट
३० मिनिटे
गैरलागू

सर्वात आधी कांदे सालासकट चांगले भाजून घ्यावेत. गार झाल्यावर साले काढावी आणि कांदे, लसणीच्या पाकळ्या, दाण्याचे कूट, तिखट, मीठ,साखर एकत्र करून अगदी बारीक वाटून घ्यावे.

ज्वारी/बाजरी/तांदूळ/नाचणी/कळण्याच्या/किंवा अजून कुठल्याही भाकरीबरोबर खायला एकदम मस्त. खाताना चटणीत कच्चे तेल घालून खावे !   

 

१. कांदे नीट भाजले नाहीत तर चटणीला उग्र वास येतो.

२. दाण्याच्या कुटाने चटणीला जरा घट्टपणा येतो.

३. चटणी आठवडाभर तरी सहज टिकते

४. चटणीवर फोडणी घातली तरी चालू शकते.

(राधिकेचे कांद्याचे लोणचे वाचून, चटणीची एकदम आठवण झाली)

आजी