गम्मत जोडाक्षरांची

मित्रहो,


जोडाक्षरे हे भारतीय भाषांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. जोडाक्षरे लिहिण्याची पद्धत भाषापरत्वे बदलते. उदा. देवनागरीत अक्षर अर्धे लिहिले की झाले जोडाक्षर. कन्नड मध्ये अर्ध्या अक्षरांसाठी वेगळे अक्षर असते. आणि जोडाक्षरातील शेवटचे अक्षर अर्धे असते (म्हणजे देवनागरीच्या विरुद्ध). म्हणजे "शब्द" ह्या शब्दामध्ये 'ब' पूर्ण काढून 'द' अर्धा काढतात. आणि हा अर्धा 'द' वेगळ्या चिह्नाने दर्शवला जातो.


तर, अश्याच तुलनेतून विचार करताना जाणवले की मराठीत एक-एक अक्षर घेऊन त्याचे इतर सर्व अक्षरांशी झालेले जोडाक्षर लिहू आणी ते ज्या शब्दात येते तो शब्द लिहू. पण गम्मत अशी की सर्वच अक्षरांचे इतर सर्व अक्षरांशी जोडाक्षर होत नाही.


तर बघा तुम्हाला काही शब्द सुचतात का (English बरेच सापडतील, मराठी सुचवा) की ज्यात खालीक जोडाक्षर आले आहे.


क हे अक्षर घेतले तर बघा काय काय combinations येतात.


क्क, क्ख, क्ग, क्घ


क्च, क्छ, क्ज, क्झ


क्ट, क्ठ, क्ड, क्ढ, क्ण


क्त, क्थ, क्द, क्ध, क्न


क्प, क्फ, क्ब, क्भ, क्म


क्य, क्र, क्ल, क्व, क्श, (क+ष), क्स, (क+ह), क्ळ, क्क्ष, क्ज्ञ


(क+ष केले की इथे क्ष लिहिले जाते, आणि क+ह केले की इथे ख लिहिले जाते)


तर मग चला. वरील पैकी अशी जोडाक्षरे शोधूयात की जी मराठी शब्दात कधीही येत नाहीत.


यानंतर इतर अक्षरे घेता येतील.


एकुणांत ४२ गुणिले ४२ इतकी जोडाक्षरे शक्य आहेत. त्यापैकी किती अस्तित्वात आलेली आहेत ते पाहूयात.


(मी व्याकरण तज्ज्ञ नाही. माझ्या ह्या लेखामागे जिज्ञासेपलीकडे कुठलीही भूमिका नाही. ह्या लेखाही मूळ कल्पनाच चुकीची असण्याची शक्यात आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा.)


 


-भाऊ.