तळलेले बटाट्याचे काप

  • मोठे बटाटे ३
  • लाल तिखट, मीरपूड, मीठ
  • तळ्ण्यासाठी तेल किंवा तूप
१५ मिनिटे
२ जण

बटाटा कापांसाठी मोठे बटाटे जास्ती चांगले. पहिल्या प्रथम बटाटयाची साले काढून मोठे उभे काप करणे. मध्यम आकाराचे. नंतर तेलात खमंग तळावेत. लाल रंग येईपर्यंत. नंतर ताटलीत काढून त्यावर आवडीप्रमाणे लाल तिखट, मीरपूड व मीठ पेरून घोळवणे. गरम गरम खाणे. चहाबरोबर किंवा दही भाताबरोबर.

मुसळधार पाउस पडत असताना किंवा थंडीत कुडकुडत असताना हे काप खाणे. घसा स्वच्छ होतो. तोंडाला चव येते व उत्साह येतो.

मामे बहीण सौ विनया गोडसे