ओंजळीतले आभाळ

ओंजळीतले आभाळ


चिमुकल्या हातांकडे पाहून
आभाळ हसून मला म्हणाले
छोटी तुझी बोटे अन मोठे
आहेत तारे!


गगनभरारीचे स्वप्न पाहतेस...
तुझ्या पंखाना सोसवेल का
वेगाचे वारे?

जा माघारी निघून जा
आहेत विजेचे सपकारे..
नाही जमायचे तुला सारे!......

पण हे म्हणताना त्याला  
कळलेच नव्हते की
त्याच छोट्या ओंजळीत
आपण सामावलो आहोत !!!