'आतल्यासहित माणूस' चे मुंबईमधील प्रयोग

परत एकदा पुढच्या प्रयोगांच्याबद्दल सांगण्यासाठी इथे येत आहे.


आपल्याला सर्वांना आठवत असेलच की काही अप्रकाशित कवितांना घेऊन मी त्यावर एक नाट्याविष्कार दिग्दर्शित केला आहे ज्याचे नाव 'आतल्यासहित माणूस' असे आहे.


याच नाट्याविष्काराचे पुढचे प्रयोग पुण्यात ५जून आणि मुंबईमधे ७ जून, ८ जून व ९ जून रोजी आहेत. सर्वांनी जरूर या. बाकी तपशील खाली देते आहेच.


५ जून २००६
स्थळः सुदर्शन रंगमंच, पुणे
वेळः संध्याकाळी ७ वाजता


७ जून २००६
स्थळः आविष्कार, माहिम, मुंबई
वेळः संध्याकाळी ७ वा ३० मिनिटांनी


८ जून २००६
स्थळः साहित्य संघ, गिरगाव, मुंबई
वेळः संध्याकाळी ७ वाजता


९ जून २००६
स्थळः रंगस्वर, यशवंतराव चव्हाण सेंटर, फोर्ट, मुंबई
वेळः संध्याकाळी ६ वा ३० मिनिटांनी


प्रयोगाची वेळ साधारण ७५ मिनिटे. प्रयोगाला मध्यंतर नाही.
प्रवेशिका प्रयोगाआधी एक तास नाट्यगृहातच मिळतील. १२ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही.


सर्वांनी जरूर या.


नीरजा