ब्र

ब्र


ब्र नाहि काढायचा


मनाच्या तळातुन


असा जीव जडवल्यावर......


ओवाळुन टाकताना आपलं सर्वस्व


कशी शिरलीस


शब्दांच्या मयसभेत?


पतंगाची प्रीत घे साक्षीला


अन्


झोकुन दे संवेदना


खाक होण्यासाठी...........


उरलाच तर एक


हुंदका


ठेव मागे,उडणाऱ्या राखेसंगे


श्वासाच्या सोबतीला..........


जगण्याची खुण म्हणुन....................!!!!!!!!


शीला.