काही (च्या काहीच ) चारोळ्या

१. हक्क माझ्या स्वप्नांवरचा


  फक्त तुलाच, इतरांना नाही


  पण जरा झोपू दे गं मला


  कालची अजून उतरली नाही.


२. तुझ्या आठवणींचा आल्बम


  काल पुन्हा काढला होता


  तेंव्हाच माझ्या लक्षात आलं


  की चष्म्याचा नंबर वाढला होता


३. वैशालीमध्ये कॉफी प्यायची


  आजकाल मला चोरी आहे


  तुझ्या आठवणी तर आहेतच


  शिवाय थकलेली उधारी आहे


 


सन्जोप राव