आज आजुबाजुला पाहताना
मला फक्त कुंपण दिसतात भली मोठी
मनाला लावलेली प्रत्येकाच्या.
ती तटबंदी लावुन
सुखावतात हे लोक----
आता मी सुरक्षित (?) आहे
'मी'पणाला चिकटुन बसतात
त्या पिंजऱ्यात
स्वताच लावलेल्या कुंपणाच्या.
पहातात मग माझ्याकडे
विचित्रपणे किंवा तुच्छतेनेही
डोळ्यांवरच्या त्या झापडांच्या कक्षेतुन-
एवढी कशी ही वेडी
कि आहे काहीतरी खोडी?
मग मीही म्हणते
जाऊ दे
मला मोकळा श्वास घेऊ दे
नाहीतरी यांची प्रेमं
ती ही आहेत बेगडी!