कविता अपार झाल्या!!!!

धरणीस भार झाल्या
कविता अपार झाल्या !


वादास तोंड फुटता
युद्धात ठार झाल्या


जमली "भुते" शितांना
पाहून गार झाल्या


स्वस्तात सर्व काही
पैशास चार झाल्या!


सारेच 'मानबिंदू'
'प्रतिभा' चिकार झाल्या


(अर्वाच्य ,सभ्य, साध्या....
जख्मा हजार झाल्या)


दर्जा कुठे उडाला
ओळी सुमार झाल्या


कुल्फीस आकळेना....
शंकाच फार झाल्या!!!!


--कुल्फी
(२३.५.२००६)