वाद्यांची झाली शस्त्रास्त्रे

वाद्यांची झाली शस्त्रास्त्रे
आलापांचे साचले डबके
दंड थोपटुनी संगीतमल्लाने
गुलकंद केले गुलाबांचे


छळतो निष्पाप समेसी
श्वास कोंडती सुरावटी
तालांचे तोल भरकटती
रक्षिण्या अखंड अहंकारी


शेजारी-पाजारी संत्रस्तले
तया गाने डांसही पळाले
काय मग बिशाद इतरांची?
जेथे गृहच निर्जंतुक जाहले!