मानवप्रेम
असला हा गुन्हा तरी
पुन्हा पुन्हा करीन मी...
माणूस आहे माणसावर
प्रेम जरुर करीन मी...!
छोटा असो वा मोठा
मान तया देईन मी..
देईन तया मोठेपणा
लहानपणा घेईन मी..
वृक्षासारखे सोसून चटके
सावली पसरीन मी...!
माणूस आहे माणसावर
प्रेम जरुर करीन मी...!
सोबतीस हवे कोणी
सोबत दुसऱ्याची बना..
म्हणावे अपुले कोणी
दुसऱ्याला अपुले म्हणा..
आपुलकीचा मंत्र हा
पुन्हा पुन्हा स्मरीन मी
माणूस आहे माणसावर
प्रेम जरुर करीन मी...!
दगडातला देव तुम्हां
कधी भेटलाहे सांगा..
माणसाला देव मानूनी
माणसासारखे वागा..
करा प्रतिज्ञा प्रेमाची
वाट पुन्हा धरीन मी...!
माणूस आहे माणसावर
प्रेम जरुर करीन मी...!
अरुणकुमार