तुंग - तुंगी

नमस्कार!
पूण्याच्या पहिल्या पाऊसाबरोबर आमची भटकंतीची सुरु झाली. रात्री थोडा पाऊस झाला [आमच्या गल्लीत तर झाला, तुमच्याकडे झालाच असेल..].. मग बेत ठरला तुंगला जायचा. तुंग ला तुंगी किंवा काथिंगड सुद्धा म्हणतात. झाले.. घाणेकरांचे पुस्तक पाहिले आणी तुंगचा बेत निश्चित झाला. सकाळी ४वा. पुण्याहुन सुरुवात.. कामशेत किंवा पौडमार्गे जाता येते. तुंग आणी तिकोणा नाही म्हटले तरी आमने सामनेच आहेत. २ महिण्यापुर्वी तिकोणा झाला आणी यावेळी तुंग..!
 
पवना धरणाच्या पाठीमागुन दुचाकीवरुन गडाच्या- पायथ्याशी जाता येते. चार चाकी साठीरस्ता फ़ारच खराब आहे... हां.. जीप असेल तर ऊत्तम!

सकाळी अंदाजे ७वा. चडायला सुरुवात केली आणी ८ वा. गडावर पोहोचलो सुध्दा..! [ - थांबत - थांबत ] वातावरण अगदी थंड हवेच्या ठीकाणासारखे होते,  त्यामुळे चढाई सोपी झाली. गडावर पाहण्यासारखे काही नाही [प्र. के. घाणेकर - साद सह्याद्रिची- भटकंती किल्ल्यांची] .. मात्र एक मंदिर आहे - तुंगी देवीचे. योग चांगला होता - अमावस्येला दर्शन झाले. काही स्थानीक लोक  दर्शनासाठी आले होते, नारळाचा प्रसादही मिळाला. जाताना खाण्याचे साहित्य घ्यायला विसरू नका आणी पाणी सुद्धा.. !


बाकि एकदा - जाऊन याच!

काही छायाचित्रे खाली देत आहे.. अधिक छायाचित्रांसाठी - माझी भटकंती पहा..!

१. पायथ्याशी असणा-या गावातुन....



२. अर्ध्या वाटेतुन...


३. पहिला दरवाजा..


४. माझे साथीदार...


५. अगदीच खुश मी... [ ऊभा दाढीवाला.. ः)]


६. गडावरुन होणारे दर्शन..


७. तुंगी देवी....


८. आणी - परतीच्या मार्गावर...




कळावे,
सर्जा.
माझी भटकंती.