प्रतिसाद !

अरे प्रतिसाद प्रतिसाद


खोटा कधी म्हणू नये


ओळ असो की शब्द एक


छोटा कधी म्हणू नये



अरे प्रतिसाद प्रतिसाद


माझ्या जीवा वाटे मोठा


गायींवीना सांगा कसा


शोभेल रिकामा गोठा


अरे प्रतिसाद प्रतिसाद


दावणीला बांधा चार


चाराहून जास्त आणा


मग मजा येते फार



अरे प्रतिसाद प्रतिसाद


अंगणातले गोधन


मायेने निरखताना


आनंदते माझे मन


 


सर्वांना गोधन लाभावे हीच प्रार्थना !


                          ( गोपाळ ) अभिजित