बह्यताड .... हा वऱ्हाडी/झाडीतल्या बोलीतला
बावळट ह्या अर्थाचा शब्द आहे.
त्याला बिलकुल 'फिल' नाही .... हा 'फिल' इंग्रजी आहे बरे का!
एकदमच 'गाफिल' आहे. .... हा 'गाफिल' उर्दू म्हणायचा !
'कॉर्पोरेट' कर म्हनलं .... इथे 'को-ऑपरेट' म्हणायचाय.
तर 'ऍग्रिमेंट' करतो. .... इथे 'ऍर्ग्युमेंट' म्हणायचाय हो.
शेवटी 'पेन्शल' खा म्हनलं, .... त्यांना 'पेन्शन घे' म्हणायचाय.
नाही तर 'शिस्पेन' करन. .... ही 'सस्पेंड' करण्याची धमकी आहे.
सही /-
- नाभा गणबा माने
अशा प्रकारे 'बह्यताड' ला सस्पेंड केल्या जाते. 'बह्यताड' झाडीतल्या
(भंडारा जिल्हा) वनखात्याच्या कुठल्याशा कामातून 'बरखास्त' होतो.
मात्र, मराठी भाषेला इंग्रजीचा एवढा साज चढेल याची कल्पना नव्हती.
ही कविता आहे का? ह्याचे उत्तर नाही हेच आहे.
पण एवढ्या कमी शब्दात प्रभावी घडामोडीला 'अंजाम' देणे हा
'वास्तव काव्याचाच' एक प्रकार असल्याचे मला वाटते.
हॅलो! आता नाभा गणाबाला शोधायला धाऊ नका.
तसले लोक आपल्याभोवतीही आहेत.