पाऊस

II  पाऊस  II

पाऊस आला पाऊस आला
झोपडपट्टी धुऊन गेला
घरांची टाळकी स्वच्छ झाली
रस्त्यावरची घाण वाहून गेली


पाऊस आला पाऊस आला
जागोजाग कूलर बसवून गेला
घामाची धार पावसात भिजली
सूर्याची वाफ ओली झाली


पाऊस आला पाऊस आला
मातीवर स्प्रे मारून गेला
ढगांचे कासव आभाळात आले
ट्रॅफिकजाममुळे डोंगरात अडकले


पाऊस आला पाऊस आला
विजेच्या तारा तोडून गेला
गटारातले पाणी रस्त्यावर आले
गटाराच्या नादाने रस्ते बिघडले


पाऊस आला पाऊस आला
छत्र्यांचे भांडण लावून गेला
केळीची साल टपून बसली
पावसाळी चप्पल चावू लागली


पाऊस आला पाऊस आला
हिरवी शाई ओतून गेला
झाडांनी केला हिरवा डाय
जमीनीवर आली हिरवी साय


                 ....देवमाणूस