उडदा मेथी

  • १ मध्यम चमचा उडिद डाळ,१ मध्यम चमचा तांदुळ,१ मध्यम चमचा मेथ्या
  • ३-४ सुक्या लाल मिरच्या,१ म,ध्यम चमचा धने,अर्धी नारळाची वाटी
  • गुळ,मीठ (चवीप्रमाणे),१ मोठी कैरी (आम्बटपणासाठी)
३० मिनिटे
३-४ जण

कोरडा मसालाः

वर दिलेल्या जिन्नसान्पैकी डाळ,तान्दुळ,मेथ्या,धणे,मिरच्या हे सर्व एक कोरड्या तव्यावर भाजुन घ्यावे.(तेल घालु नये). डाळीचा रन्ग चान्गला लाल झाल्यावर .शेगडी बन्द करून तवा गार होउन द्यावा. हे मिश्रण मिक्सर मधे बारिक वाटुन घ्यावे. नारळ सुद्धा असाच बारिक वाटुन घ्यावा.

पातेल्यात तेल घेउन भरपुर मोहरी,हिन्ग,हळद,४-५ मेथी दाणे घालुन फोडणी करावी.त्यात कोरडा मसाला आणि अर्धा नारळ घालावा. व चान्गले खमन्ग परतावे. कैरीचे जरा मोठेच तुकडे करुन सालासकट त्यात घालावेत. पुन्हा परतुन १ वाटी पाणी घालुन उकळी आणावी. चवीप्रमाणे मीठ , गुळ घालावे. मिश्रण जरा घट्ट होउ लागले की उरलेला नारळ अन्दाजे घालावा. नारळाने आणि उडदाच्या डाळीमुळे आमटी दाट होते.

 

 

ही गोव्याकडील एक खास प्रकारची आमटी आहे. बरेचदा कैरी अईवजी आम्बाडे नावाचे एक फळ वापरले जाते. मान्साहारी लोक यात सोडे,बान्गडा घालतात.

माझी सासू