सातीच्या खांद्यावर राखीचे ओझे!

सातीच्या खांद्यावर,
राखीचे ओझे, राखीचे ओझे ॥ धृ ॥


कशासाठी उतरावे, मदत घेऊन ।
कोण येते कुणासाठी, देव होऊन ॥
असहाय्य येथे कोणी, सडती कुजून ।
मात्र 'राखी'ला लाभती, 'भारवाही' अवघे ॥ १ ॥


सातीच्या खांद्यावर
राखीचे ओझे, राखीचे ओझे ॥ धृ ॥


प्रज्ञावंत सर्व जाती, विरून विझून ।
गुणवंता शांती लाभे, घोर अंधारात ॥
सत्त्वशीला अब्रुहानी, खचित होई जेथे ।
'राखी'च्या मदतीला येथे,'साती' मात्र जाते ॥ २ ॥


सातीच्या खांद्यावर,
राखीचे ओझे, राखीचे ओझे ॥ धृ ॥