सांभाळा जीवना

सांभाळा जीवना, मृत्यूपंथ ना धरू द्या


सांभाळा जीवना, मृत्यूपंथ ना धरू द्या |  हरपते आहे शांती, देश संकटात आहे ||
प्राण देशास्तव, देण्याची भावना रुजवा |  सांभाळा जीवना, मृत्यूपंथ ना धरू द्या || धृ ||


एकीकडे प्रेम आहे, आवडही, निष्ठाही आहे |  दुसरीकडे देशातच, धोका आणि फितुरीही आहे ||
वस्त्या भयभीत, आणि देशही भयग्रस्त आहे |  स्वप्ने सारीच जणू, दु:खपूर्ण शोककथा ||
शिंपती पाणी ना, ते वर्षती अग्नीच जेव्हा |  शेते मौजेने विहरणारी, होती ध्वस्त तेव्हा ||
हरपते आहे शांती, देश संकटात आहे |  प्राण देशास्तव, देण्याची भावना रुजवा || १ ||


कामे वाईट नका, पत्करू पैशांकरीता |  वाईटच शेवटही, हरेक वाईटाचा असे ||
जुल्मी लोकांचीही, का जीवने मोठी असती |  त्यांच्या मार्गीही सदा, यमदूत उभेची असती ||
जुलुम केल्याने सदा, जुलुमची पदरी पडतो |  सत्य न बोले जो तो, नक्की घाबरट असतो  ||
देशभक्तांनी, रक्त शिंपून, फुलविली जी ती |  उपवने ना, कदापीही उजाडू द्या हो || २ ||


मूळ हिंदी गीत: जिंदगी मौत ना बन जाए
गीतकारः जावेद अख्तर, संगीत: जतीन-ललित
गायक सोनू निगम आणि रूपकुमार राठोड, चित्रपट: सरफरोश


मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०६२०