अमरनाथ आणि बर्फाचे मानवनिर्मित शिवलिंग

अमरनाथ यात्रे  दरम्यान  नैसर्गिकपणे बर्फाचे शिवलिंग तयार व्हायला हवे होते ते यंदा होऊ शकले नाही. त्यामुळे ते कृत्रिमपणे तयार केले गेले. एखाद्या श्रद्धेच्या आहारी जाणे म्हणजे काय याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. समजा शिवलिंग तयार झाले नसते तर असे काय आभाळ फाटणार होते? नैसर्गिकपणे शिवलिंगाची निर्मिती न होणे हा निसर्गानेच `नकळतपणे'  दिलेला एक इशारा आहे. हवामानात वेगाने घडून येणा-या  बदलांमुळे  आता नियमित घडणा-या घटना `टळत' आहेत.


शंकर म्हणजे साक्षात निसर्गाचेच प्रतीक आहे हे या घटनेने सिद्ध होते. ही काही देवाची मर्जी नाही की अवकृपा नाही. हवामानातील बदलांना निसर्गाने पुराव्या  सहित देलेले उत्तर आहे. पण प्रतीकांनाच देव समजून बसलेल्या भाबड्या श्रद्धांमुळे कृत्रिम शिवलिंग निर्माणे करावे लागते. यात अजूनही `अर्थ'पूर्ण असे पैलू असू शकतात. पर्यावरणाच्या -हासाबद्दल जागृती करण्याची संधी  मात्र या घटनेने निसटून गेली आहे.