मेघदूत (श्लोक २२-२७)

उत्पश्यामि द्रुतमपि सखे मत्प्रियार्थं यियासोः कालक्षेपं ककुभसुरभौ पर्वते पर्वते ते ।
शुक्लापाङ्गैः सजलनयनैः स्वागतीकृत्य केकाः प्रत्युद्यातः कथमपि भवान् गन्तुमाशु व्यवस्येत् ।। २२ ।।


काळ सरेल बहु जरी घाई मजसाठी
दरवळ कुकुभ पुष्पांची पर्वतांवरी
निरोप मोरांचा घ्यावा उत्सुक स्वागतासी
आळविती राग जळी जडावल्या डोळ्यांनी


पाण्डुच्छायो पवनवृतयः केतकैः सूचिभिन्नैः नीडारम्भैर्गृहबलिभुजामाकुलग्रामचैत्याः ।
त्वय्यासन्ने परिणतफलश्यामजम्बूवनान्ताः संपत्स्यन्ते कतिपयदिनस्थायिहंसा दशार्णाः ।। २३ ।।


केतकीच्या फुललेल्या श्वेत फुलांची जणू छाया
शोभिवंते वन संपता दशार्ण देशाची सीमा
आगमन तुझे जवळ जाहले असे तयाच्या
गावात फळांनी श्याम डवरल्या जंबू तरूंच्या


भुजा बलवान तयांच्या संपन्न परी जाहल्या
घरटी काक आणिक इतरही पक्षीसृष्टीच्या
कोलाहल भरतो तेथ आसमंत रचण्याचा
निवास अवश्य तेथ काही दिवसांचा हंसांचा


तेषां दिक्षु प्रथितविदिशालक्षणां राजधानीं गत्वा सद्यः फलमपि महत् कामुकस्य लुब्धा ।
तीरोपान्तस्तनितसुभगं पास्यसि स्वादु यंत्र सभ्रुभङ्गं मुखमिव पयो वेत्रवत्याश्चलोर्म्याः ।। २४ ।।


वेत्रावतीच्या तीरी पितांना गोड पाणी
गुंजतो नाद खेळत्या लाटांचा उत्साही
जणू पापण्या मुखी पिडल्या कामज्वरी
येता जव तू विदिशा नाम राजधानी


नीचैराख्यं गिरिमधिवसेस्तत्र विश्रामहेतोस्त्वत्संपर्कात्पुलकितमिव प्रौढपुष्पैः कदम्बैः ।
यः पण्यस्त्रीरतिपरिमलोद्गारिभिर्मागरणामुद्दामानि प्रथयति शिलावेश्मभिर्यौवनानि ।। २५ ।।


आराम करावा नीचै नामक पर्वतासी
कदंब फुलांनी मुदित तव सान्निध्यानी
दरवळल्या गुहा तयाच्या रतिक्रिडेनी
गंध उधळी उद्दाम द्रव्याची तरूणाई


विश्रान्तः सन्व्रज वननदीतीरजानां निषिञ्चन्नुद्यानानां नवजलकणैर्यूथिकाजालकानि ।
गण्डस्वेदापनयनरुजाक्लान्तकर्णोत्पलानां छायादानात्क्षणपरिचितः पुष्पलावीमुखानाम् ।। २६ ।।


विश्रांती होताच पुन्हा प्रस्थान
शिंपडीत जास्वंदाचे पराग
उद्यानांनी पसरल्या ताटव्यांत
ओळी वननदीच्या तीरांवर


छायेचे छत्र मस्तकी धरून
दे क्षणभर परिचय स्त्रियांस
कर्णफुले जयांची झाली म्लान
फुले वेचितांना श्रम अपार


वक्रः पन्था यदपि भवतः प्रस्थितस्योत्तराशां सौधोत्सङ्गप्रणयविमुखो मा स्म भूरुज्जयिन्याः ।
विद्युद्दामस्फुरितचकितैस्तत्र पौराङ्गनानां लोलापाङ्गैर्यदि न रमसे लोचनैर्वञ्चितोऽसि ।। २७ ।।


फुगडी खेळतो मार्ग उत्तर दिशेला
परी टाळावा दुरावा प्रणयी वीजेचा
नांदते ती उज्जैयनीकरांच्या नयना
चलबिचल न होऊ देईल चतुरा


(क्रमशः)