चन्द्रापरी तू सामोरी असता भिती कशाला तिमिराची..
तू समर्थ असता सावरायला पर्वा कुणाला वेदनेची..
हातात नसले हात तरीही फक्त मनाने साथ दे..
प्रेयसी होऊनी राहण्यापेक्षा सखी म्हणुनी हात दे..
मरणे अनन्त भोगली सुखाची तू ममतेचे जीवदान दे...
मुक्त होण्या शापातून प्रेमाच्या तू मैत्रीचे वरदान दे...