" चिता "

सोनसळी ऊन्हामध्ये नभ दाटून आलेले जरासे..


जमल्यात परत त्याच आठवणी .. काही हुंदके अन उसासे..


थिजल्या डोळ्यांनी बघतो खेळ हा प्राक्तनाचा...


दोष ना ह्यात काही.. ना तिचा ना माझा ना नशिबाचा...


येता स्मरणात ती सुटतात संयम सगळे तुटतात निग्रह ही...


जळत राहतो चितेसारखा बरसणाऱ्या पावसात ही...