मनोगत.....
मागे वळूनी आज पाहता
भरून येतो ऊर अनंता
सखा सोबती तू सांगाती
तूच तूच रे पाठिराखा....
आप्तजनांचे क्रौर्य पाहीले
सुह्रुदांचे औदार्य पाहीले
नमविला न कोठेहि माथा
तव चरणी परी लिन शिवसुता...
कौतुकाच्या शिखरावरती
सगे सोयरे अवती भवती
परि दुःखाच्या सीमेवरती
तुझा हात रे माझ्या माथी......
न मागता जे दान दिले तू
स्विकारिले ते प्रयत्नांसवे
दिली न दूषणे कधी कुणाला
अंगिकारले असिधारेला.....
झेप घ्यावया दिलीस ताकद
पंखांना या जोडून चिलखत
साकारा मज दिवास्वप्न तू
आशिर्वचने दिली सर्वदा....
अंतःकरणी इच्छाशक्ति
पूरी कराया दिलीस भक्ती
अपार माया सहन शक्ती
अन तेजोमय तव प्रेमळ द्रुष्टी...
आज यशाच्या चढणीवरती
मनोकामना असे विनंती
सदैव राहो नतमस्तक मी
तुझ्याच चरणी तुझ्या अर्चनी.......
शीला