जखमा

कधीकधी नात्यांना नावच देता येत नाही,


अन निनावी  असं नातं जपताही येत नाही,


अशीच नकळत कधीतरी जखम होते,


आणी विसर पडला की विरुण जाते.


 


 


एक,


आजवर तिला घाबरत आलो


तिच्यापासुन दुर सरकत आलो,


जेंव्हा तिच्यातुन माझंच रक्त गळालं


तिच्याशी असलेलं रक्ताच नातं कळालं.


 


दोन,


आताशा मी माझ्या जखमांना 


मलम लावणं सोडलय,


नात्यांणीच जखमा दिल्यात


आता जखमांशीच नातं जोडलय.


 


तीन,


 


या पुढं मीच माझ्या जखमांवर


रोज मीठ चोळणार आहे,


कुत्री-मांजरं तर कुणीहि पाळतं


मी जखमा पाळणार आहे.