तू केलेला घाव वर्मी बसून गेला
तरी नेहमीचा सलाम मी हसून केला.
ठेवू कुणा कुणावर भरवसा आता
जो अंदाज केला, तो फसून गेला.
सोन्यालाही नसावा कधी कस असा
मला जो भेटला, तो कसून गेला.
लाड कुणा कुणाचे पुरवू आता
ज्याचे केले होते, तो रुसून गेला.
शुक्रतारा मानला होता मी त्याला
निखळताना मला,तो दिसून गेला.
अजय