मनोगतींसाठी हे एक कोडे-
सांगा, मासा कुणाचा?
एका रस्त्यावर ओळीने पाच घरे होती, पाच वेगवेगळ्या रंगांची. ह्या घरांमध्ये वेगवेगळ्या देशाचे नागरिक राहत होते. प्रत्येकाकडे एक वेगवेगळा पाळीव प्राणी होता. प्रत्येकाचे पेय वेगळे आणि सिगरेटींचा ब्रँडही वेगळा.
१. ब्रिटिश मनुष्य लाल रंगाच्या घरात राहत असे.
२. स्विडिश माणसाकडे कुत्रे होते.
३. डॅनिश मनुष्य चहा पित असे.
४. हिरव्या रंगाचे घर पांढऱ्या घराच्या डाव्या बाजूस होते.
५. हिरव्या घराचा मालक कॉफी पित असे.
६. पॉल-मॉल ओढणाऱ्याकडे पक्षी होते.
७. पिवळ्या घराचा मालक डनहिल ओढत असे.
८. मधल्या घरात राहणारा मनुष्य दूध पित असे.
९. नॉर्वेजिन मनुष्य पहिल्या घरात राहत असे.
१०. ब्लेंड्स ओढणारा मनुष्य हा मांजरी पाळलेल्या मनुष्याचा शेजारी होता.
११. घोडे पाळणारा मनुष्य हा डनहिल ओढणाऱ्याचा शेजारी होता.
१२. ब्लू मास्टर ओढणारा बीअर पित असे.
१३. जर्मन मनुष्य प्रिन्स (हा सिगरेटीचा ब्रँड) ओढत असे.
१४. नॉर्वेजिअन मनुष्याचे घर निळ्या घराशेजारी होते.
१५. ब्लेंड्स ओढणाऱ्याचा एक शेजारी पाणी पित असे.
हे कोडे अल्बर्ट आइन्स्टाइन ने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लिहिले आणि (त्यावेळची?) ९८% जनता हे कोडे सोडवण्यास असमर्थ ठरली असे म्हणतात. मात्र हे कोडे एवढे अवघड नाही. तर सांगा मासे पाळणारा कोण?
उत्तर येत्या रविवारी (२ जुलैला) जाहीर करण्यात येईल. उत्तरे व्य. नि. ने पाठवा.