महाराष्ट्राला दुःख झाले
मिकाने घेतला मुका
तोच जाणे कसा
बरोबर साधला मोका
तुम्ही आम्ही पहात राहीलो
मुके होउन मुका
हे असलं होणारच
हात झटकुन टाका
कोण शहाणा म्हणतोय तो
मिकाला चांगला धडा शिकवा
त्याला म्हणावं राखीला आधी
झाकण्यापुरते कपडे चढवा
त्यांच आपलं फ़ावतं
फ़ुकट चर्चा होते
जाहीरातीच्या बजेटअमधे
त्यांची चांगलीच बचत होते
मला खात्री आहे
सगळाच होता बनाव
मी गालावर, तु ओठावर
प्रसिद्धीची मोहोर लाव
तुम्ही आम्ही पांडु सारे
उगाच चर्चा करतो
नको नको त्या चाळ्यांची
आपण जाहीरात करतो
मीही वाट बघतोय आता
राखीच्या नव्या अल्बम्ची
रोज तिच्या भोवती फ़िरतोय
वाट पहात संधीची
कोण जाणे राखी आता
कोणती संधी शोधेल
चुकुन माकुन मलाही तिच्या
"जाहीरातीत काम" मिळेल
(राखीचा) मन्नु