नजरांचा खेळ

पुन्हा एकदा खेळून पाहू
चल नजरांचा खेळ,
भर ग्रीष्मातही बहरून जाईल
प्रीत फुलांचा वेल,


काट्यांमधूनी धावून स्वप्ने
दवबिंदूंची झेल,
पाऊल दुखरे पाहून
घालू सुख-दुःखांचा मेळ.