मोगलाई

धर्मपत्नीशी लढाई चालली
मेहुणीची सरबराई चालली

फाटल्या साऱ्या विजारी-पैरणी
बायकोशी दिल-जमाई चालली

कोरडा मधुचंद्र गेला, दोस्तहो
मम प्रियेची गाईगाई चालली

वाढली संख्या सख्यांची एव्हढी
प्रेमपत्रांची छपाई चालली

मांडवाखालून गेल्या मैत्रिणी
सोबतीने फक्त ताई चालली

साथ आली मान दुखण्याची कशी
ती पहा एक टंच बाई चालली

पाहता चोरून मी  'दुसरी' कडे
ही घरी माझी धुलाई चालली

एकटा होतो, सुखी होतो सडा
हाय, आता मोगलाई चालली


मूळ प्रेरणास्रोत ः शिवश्री यांची 'हातघाई' ही सुंदर गझल - इथे पहा - http://www.manogat.com/node/6447