मीलन

मुसळधार पावसासोबत आलीस तू!!
कस आवरु तुला?
आकाशाला कवेत घेउन कोसळलीस तू
का सावरु तुला?!
त्या अफाट पसरलेल्या आकाशात....
बेभान सुटलेल्या वार्यात्.....
कुठे आणी किती ठिकणी भेटलीस तू?
तुझ्या कोसळण्यापुढे मी निस्तब्ध्; उभा निःशब्द ..
अजुनही त्या पावसानी मंत्रमुग्ध-भारलेला...


तुझ्या प्रत्येक सरीबरोबर् तू अश्रु पुसत होतीस्;


अन मला कुशेत घेउन तूच हलके हलके रडत होतीस्.
ईथे टेकडीवर् आता कुणीच नाही-तुझ्या माझ्या शिवाय्.
तु सर्वत्र सर्वव्यापी- प्रवाही-
गंगोत्री-जन्मदात्री;
माझ्या अस्तित्वाला मांगल्याने भिजवणारी;


दाटून आली आहेस् तुच् सर्व दिशांनी.
आणी आत परत डोंगर जीवंत झालाय..
तुझ्या मुसळधार लाटांनी...
----------------
"शब्दातच स्पर्षरूप् जे स्वरघनात पाहतो!
शब्दातच अर्थरूप जे जलधारात  पाहतो!
सांडतो जेव्हा तो स्वर्गमेघांचा कुंभ-
अर्थ तेव्हा जीवनाचा मी गुलाबात पाहतो!"